उपयुक्त शैक्षणिक ॲप्स

   ♣ *अँपची शाळा-स्मरणशक्ती वाढवा*
           
        सोशल नेटवर्किंग साइटवर तुमच्या डोळ्यांची चाचणी घेणारी अनेक कोडी तुम्ही सोडवली असतील. समजा स्क्रीनभर 7 हा इंग्रजी अंक लिहिलेला आहे आणि त्यामध्येच एखादा 1 हा इंग्रजी अंक किंवा i हे इंग्रजी अक्षर लिहिलेले असल्यास ते आपल्याला काही क्षणात शोधता येते का ?
     हाच खेळ अनेक इंग्रजी 8 च्या आकडय़ांमधून 3 चा अंक शोधण्यासाठी खेळता येईल. खरे तर या कोडय़ात कठीण असे काहीच नाही; परंतु अशा प्रकारच्या कोडय़ांमध्ये तुमच्या नजरेची चांगली कसोटी लागते.*आज आपण स्मरणशक्ती वाढवणाऱ्या, प्रतिक्षिप्त क्रिया, अचूकता, जलद गतीने निर्णय घेण्याची क्षमता वाढवणाऱ्या Laurentiu Popa  ¨FZ Skillz –Logical brain game या अँपची माहिती घेणार आहोत*

*Laurentiu Popa  ¨FZ Skillz –Logical brain game*
         या अॅपमध्ये एकूण *42 लेव्हल्स* आहेत. प्रत्येक लेव्हलमध्ये तुम्हाला 1 ते 5 स्टार्स मिळवण्याची संधी आहे. पहिल्या लेव्हलपासून तुम्ही जितके जास्त स्टार्स मिळवता तशा पुढील लेव्हल्स अनलॉक होण्यास मदत होते.
*उदा-* पंधरावी लेव्हल अनलॉक करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 45 स्टार्स असणे आवश्यक आहे.या अॅपमधील प्रत्येक कोडे वेगळ्या प्रकारचे आहे.त्यातील काही कोडय़ांची माहिती थोडक्यात घेऊ. *लेव्हल 2* मधील कोडय़ात तुम्हाला १ ते२४ आकडे उतरत्या व चढत्या क्रमाने लावायचे आहेत. या पझलमधे क्रिया जलद करण्यास महत्त्व आहे.
*लेव्हल 4* मध्ये तुम्हाला दिलेले वाक्य चूक आहे की बरोबर हे सांगायचे आहे. *उदा-* हिरव्या रंगाचे वर्तुळ दाखवून विचारले जाते की, ‘हे वर्तुळ हिरव्या रंगाचे आहे काय ?’ किंवा केशरी रंगाचे वर्तुळ दाखवून विचारले जाते की, ‘हा केशरी रंगाचा चौरस आहे?’ विचारलेले वाक्य व दाखवले गेलेले चित्र यांची तुलना करून चूक की बरोबर ठरवावे लागते. शिवाय यासाठी वेळेचे बंधन आहेच. आपल्याला केशरी रंगाचे वर्तुळ दिसत असेल व प्रश्नात हा केशरी चौरस आहे, असे विचारले असेल तर भराभर उत्तर देण्याच्या नादात केवळ केशरी शब्दांकडे लक्ष दिले जाते व चौरस या शब्दाकडे दुर्लक्ष होऊन उत्तर चुकू शकते.
  *रंगछटांचा क्रम म्हणजेच फिकट ते गडद असा क्रम लावणे किंवा बॅकग्राऊंडला दाखवलेला रंग रंगचक्रात (कलर व्हील) शोधण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारची पझल्सदेखील आहेत.* प्रत्येक कोडय़ातील वेगळेपण तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवणारे आहे. गुगल प्लसवर साइन इन करून तुम्ही काही निवडक खेळ अनेक प्लेअर्ससोबतदेखील खेळू शकता.
          *हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
👇👇👇👇👇👇👇👇👇
                DOWNLOAD
 

🌐 *टेक वार्ता* 🌐
*दररोज जाणून घ्या पेट्रोल डिझेल चे भाव मोबाईल वर.*

                 आता दररोज बदलणारे पेट्रोल व डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इंडियन ऑईल कार्पेरेशनने खास अ‍ॅप कार्यान्वित केले आहे. तसेच वेबसाईट व एसएमएसच्या माध्यमातूनही ही माहिती मिळू शकेल.
             १६ जूनपासून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर होणार असून यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. दररोज बदलणार्‍या भावांना नेमके लक्षात कसे ठेवावे? हा प्रश्‍न उपस्थित होणार असून यासोबत एखाद्या पेट्रोल पंपावर आपली फसवणूक तर होत नाही ना? ही भितीदेखील सतावणार आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत इंडियन ऑइल कार्पोरेशन या कंपनीने *Fuel@IOC – IndianOil* हे खास स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन कार्यान्वित केले आहे.
            *Fuel@IOC – IndianOil* हे अ‍ॅप आपण गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.एकदा का हे अ‍ॅप आपण स्मार्टफोनवर इन्स्टॉल केले की, मग याच्या मदतीने आपण पेट्रोल व डिझेलचे ताजे दर जाणून घेऊ शकतात. यावर लोकेट अस या पर्यायावर क्लिक करताच आपल्याला नकाशावा जवळपासच्या सर्व पेट्रोल/डिझेल पंपचे लोकेशन समजेल. यावर नजीकचे पंप हिरव्या रंगाने चिन्हांकीत केलेले असतील. यावर क्लिक करताच आपल्याला त्या पंपावरील पेट्रोल वा डिझेलचे दर समजू शकतील.
                 हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
                          CLICK HERE

🎇 *ऍडोब स्कॅन* 🎇

           अडोबी सिस्टीम्स या सॉफ्टवेअरमधील आघाडीच्या कंपनीने डॉक्युमेंट स्कॅनिंगसाठी ‘अडोबी स्कॅन’ या नावाने अ‍ॅप अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी सादर केले आहे.
          वास्तविक पाहता विविध डॉक्यमेंटच्या स्कॅनिंगसाठी अनेक अ‍ॅप्लीकेशन्स आधीच उपलब्ध असतांन ‘अडोबी स्कॅन’चे आगमन झाले आहे. तथापि, यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण फिचर्स असून याच्या मदतीने आपला स्मार्टफोन हा अत्यंत दर्जेदार स्कॅनरमध्ये परिवर्तीत होऊ शकतो.

💢 यात कोणत्याही डॉक्युमेंटला स्कॅन करून त्याला ‘पीडीएफ’ फॉर्मेटमध्ये परिवर्तीत करता येते.

💢 डॉक्यमेंटमधील अक्षरांना ओळखून त्याला संपादीत करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे.

💢 अडोबी कंपनीनेच विकसित केलेल्या सेन्सेई इंटीलिजीयन्स सर्व्हीसच्या मदतीने यात ऑटो क्रॉप व कॅप्चर, ऑटो-क्लिन/रोटेट आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.

💢 याच्या मदतीने अतिशय तत्पर व सुबक पध्दतीने डॉक्युमेंट स्कॅन करता येते.

💢 अ‍ॅटोमॅटीक स्कॅन डिटेक्शन या प्रणालीच्या मदतीने संबंधीत पार्श्‍वभागावर असणार्‍या मजकुराची पडताळणी होऊन त्याला संपादीतदेखील करता येते.

💢 स्कॅन वा संपादीत केलेले डॉक्युमेंट हे अडोबीसह विविध सेवांवर ‘सेव्ह’ करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे.

💢 अडोबी क्लाऊड सेवेवर अकाऊंट असणार्‍यांसाठी हे अ‍ॅप अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी मोफत वापरता येते.

अडोबी स्कॅन अ‍ॅप डाऊनलोड लिंक
                CLICK HERE



🎼 *बॉलीवूड रागाज’ (Bollywood Ragas)* 🎼
                या अ‍ॅपच्या निर्मात्यांनी हिंदी सिनेसंगीताच्या माध्यमातून रागदारीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
या अ‍ॅपमध्ये आजमितीस *शास्त्रीय संगीतातील ६१ लोकप्रिय रागांची थोडक्यात माहिती दिलेली आहे.* हे राग सामान्यपणे कोणत्या वेळी गायले जातात त्यानुसार रागांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. *प्रत्येक रागातील आरोह आणि अवरोहातील स्वर कोणते आहेत याची माहिती दिली गेली आहे. आणि त्याचा ऑडिओ ऐकण्याचीसुद्धा सोय आहे.*
                  रागाचा अभ्यास करणाऱ्या इच्छुकांना रागातील वादी-संवादी स्वर आणि त्याची पकड यासारख्या गोष्टीही सांगितलेल्या आहेत.
संगीतप्रेमींचा असाही खूप मोठा वर्ग आहे की, ज्यांना प्रत्यक्ष रागाचे स्वरज्ञान नसले तरी रागांवर आधारित गाणी त्यांना खूप आवडतात. एखादे गाणे अमुक एका रागावर आधारित आहे, हे कळल्यावर मग त्या रागावर आधारित दुसरे गाणे सहज ओळखता येते. *या अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे अंदाजे साडेआठशे लोकप्रिय हिंदी गाण्यांची येथे रागांप्रमाणे वर्गवारी केलेली आहे.* उदाहरणार्थ, यमन रागावरील ३१ गाणी, तर पहाडी रागातील ७८ गाण्यांना येथे लिंक दिलेली आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास तुमच्या आवडीप्रमाणे ते ऑडिओ किंवा व्हिडीओरूपात ऐकवले जाते. ही गाणी ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी तुम्ही इंटरनेटशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
                 एखाद्या विशिष्ट सिनेमातील किंवा संगीतकाराचे किंवा रागातील गाणे ऐकण्यासाठी सर्चची सोय या अ‍ॅपमध्ये दिलेली आहे. गाण्यांची यादी डिक्शनरीप्रमाणे हवी की जुन्यापासून नव्यापर्यंत हे तुम्हाला सांगता येते. दर्दी मंडळींना या गाण्यांच्या यादीमध्ये भर घालण्याचेही आवाहन या अ‍ॅपमध्ये करण्यात आले आहे. त्यासाठी *‘सजेस्ट अ साँग’ (Suggest a Song)* या मेनूखाली सोय करण्यात आलेली आहे. मुख्य म्हणजे ही साइट इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
      हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
                      DOWNLOAD


🎯  *वर्ड्स क्रश : हिडन वर्ड्स !*
                   Bit Mango बिट मँगोच्या वर्ड्स क्रश : हिडन वर्ड्स! या अॅपमधे अगदी सोप्यापासून अतिशय अवघड शब्द वेगवेगळ्या पाच भागांत विभागले आहेत. अंदाजे १२०० हून अधिक कोडी येथे उपलब्ध आहेत. यामध्ये दोन बाय दोन, तीन बाय तीन, चार बाय चार अशा चौकटींमध्ये इंग्रजी अक्षरांच्या टाइल्स दिसतात. उदाहरणार्थ तीन बाय तीनच्या चौकटीत ९ अक्षरे आपण बघू शकतो. दिलेल्या सर्वअक्षरांचा उपयोग करणे आवश्यक असते. काही कोडय़ांत सर्व अक्षरांचा उपयोग करून एकच शब्द बनवायचा असतो. तर काहींमधे दोन शब्द बनवायचे असतात. तुम्ही बनवलेला शब्द त्यांच्या उत्तराशी जुळत असेल तर त्या टाइल्स दिसेनाशा होतात. टाइल्स निवडण्यासाठी तुम्हाला स्पेलिंगप्रमाणे टाइल्सवर बोट फिरवावे लागते. तुम्ही उभे, आडवे, तिरपे, वरून खाली, खालून वर अशा पद्धतीने टाइल निवडू शकता.
                 हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
                     
                    CLICK HERE


💥  * वर्ड्स क्रश : हिडन थीम्स !*
            या अॅपमध्ये वेगवेगळ्या विषयांशी संबंधित असलेले शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. यामध्ये प्राणी, घरात आढळणाऱ्या गोष्टी, हवामान, वाहतूक असे २०० हून अधिक विषय हाताळले आहेत.
          हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

                         CLICK HERE



🎯 *‘आयक्यू टेस्ट सागा’ (IQ TEST SAGA)*
                     या अँप मध्ये बुद्धिमत्ता चाचण्यांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रकारांतील प्रश्न एकत्र करून चाचण्या तयार केलेल्या आहेत. अ‍ॅप सुरू केल्यावर ही *चाचणी कशी द्यावी याची माहिती इन्स्ट्रक्शन्स मेनूखाली थोडक्यात दिलेली आहे.* यातील सूचना पाहून झाल्यावर तुम्ही चाचणी देण्यास सुरुवात करू शकता.
या बहुपर्यायी चाचणीमध्ये *१० मिनिटांमध्ये १५ उत्तरे द्यायची असतात.* जर एखादे उत्तर तुम्हाला येत नसल्यास तुम्ही पुढच्या प्रश्नावर जाऊ शकता आणि नंतर वेळ उरल्यास मागे येऊ शकता. *तुमचे उत्तर चुकले असल्यास योग्य उत्तर स्पष्टीकरणासह दाखवले जाते.*
या चाचणीद्वारे आलेला आपला आयक्यू गुणांक तारखेसह संचित करण्याची सोय असून तो इतरांबरोबर तुम्ही शेअर करू शकता. यात  चाचणीशिवाय *रॅपिड फायर टेस्ट*ही येथे दिलेली आहे ज्यात एकामागोमाग एक कूट प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न एका मिनिटात सोडवायचा असतो. या वेळात बरोबर उत्तर दिल्यास पुढचा प्रश्न विचारला जातो आणि तुम्ही चुकीचे उत्तर दिल्यास टेस्ट थांबते. *तुमचा मेंदू न थकता किती काळ सलग अचूक काम करत राहता हे या चाचणीत बघितले जाते.*
बुद्धिमानांक मोजणारी बरीच अ‍ॅप्स तुम्हाला प्ले स्टोअरवर दिसतील. वेगवेगळ्या अ‍ॅपद्वारा मिळणारे तुमचे IQ सारखे असतील असे नाही. याचे कारण या बुद्धिमत्ता चाचण्या समाजातील कुठल्या गटाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या आहेत यावर त्या चाचण्यांचे निष्कर्ष अवलंबून असतात. व्यक्तीचे समाजातील स्थान, वय, परिसर, चालीरीती यानुसार त्याची बुद्धिमत्ता विकसित होत असते. त्यामुळे समाजातील विविध समूहांच्या बुद्धिमत्तेचे मापन करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या लावाव्या लागतात. या अ‍ॅप्सद्वारे मिळणारा बुद्धिमानांक हा पूर्णपणे अचूक नसला तरी तो सामान्यपणे मार्गदर्शक ठरू शकतो. शिवाय या प्रकारच्या चाचण्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त आहेत.
                    आयक्यू टेस्ट-व्हॉट्स माय आयक्यू हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील ही लिंक वापरा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
                  DOWNLOAD



👉 *‘ब्रेन इट ऑन’(Brain it on)* 👈
                  या अॅपमधे भौतिकशास्त्रावर आधारित धमाल पझल्स आहेत. प्रत्येक पझलमध्ये काही तरी वेगळी कृती करायची आहे. पझल उघडल्यावर स्क्रीनवर आपल्याला त्या पझलमधे नक्की काय करायचे आहे ते सांगितले जाते.
उदाहरणार्थ:-
एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवलेली वस्तू जसे की, एखादा रिकामा ग्लास तुम्हाला आडवा करायचा आहे. किंवा उंचावर असलेल्या एखाद्या सपाट पृष्ठभागावरील तीन चेंडूंपैकी केवळ दोन चेंडू जमिनीवर असलेल्या एका ग्लासामध्ये पाडायचे आहेत. हे करण्यासाठी तुम्ही बोटाच्या साहाय्याने गोल, चौकोन, त्रिकोण, उभी किंवा आडवी, तिरपी रेषा यापैकी कुठलाही आकार एक वस्तू म्हणून काढू शकता. त्या वस्तूचा आकार तुम्हाला हवा तेवढा लहान-मोठा काढू शकता. आकार काढून झाल्यावर तो (न्यूटनच्या सफरचंदाप्रमाणे) वरून खाली पडेल.
                 आता समजा जमिनीवरील उभा ग्लास आडवा करण्यासाठी कोणत्या आकाराची वस्तू ग्लासावर पडली तर तो ग्लास आडवा पडेल याचा प्रयोग करून बघायचा आहे. वरवर बघता कुठलीही वस्तू त्या ग्लासवर पडली तरी ग्लास आडवा पडेल असे वाटते. परंतु प्रत्यक्षात तसे होतेच असे नाही. मग कुठली वस्तू वापरल्यावर काय होते हे याचे प्रात्यक्षिक तुम्ही येथे बघू शकता.
                  हे तुम्हाला खेळामध्ये मनोरंजक अॅनिमेशनद्वारे दिसते.ग्लासच्या कोपऱ्यावर तुम्ही गोल, चौकोन, त्रिकोण यांपैकी एखादा आकार वरून टाकलात तर ग्लास आडवा पडू शकतो. परंतु योग्य अंतरावरून हा आकार सोडला नाही तर आकार एकतर ग्लासमधे पडू शकतो किंवा जमिनीवर. तसेच आपण काढलेला आकार किती लहान-मोठा आहे यावरदेखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या पझलसाठी कुठलेही एक ठरावीक उत्तर नाही. जी कृती केल्याने त्या पझलमध्ये ठेवलेले लक्ष्य पूर्ण होते ते त्याचे उत्तर. ज्या कृतीमुळे कमीत कमी वेळात पझल पूर्ण झाले ते आदर्श उत्तर म्हणता येईल.एखाद्या पझलमध्ये एकापेक्षा अधिक आकृत्या काढण्याची आवश्यकता भासू शकते. एखाद्य पझलमध्ये किती आकृत्या लागू शकतात आणि हे पझल किती सेकंदांत पूर्ण करायचे आहे हे पझलसोबतच दाखवले जाते.
         एखाद्या पझलचे उत्तर मिळत नसल्यास प्रश्नचिन्हावर क्लिक करून हिंटची मदत घेता येते.इतर सर्व खेळांप्रमाणेच या खेळातही बऱ्याच लेव्हल्स आहेत. या खेळात भौतिकशास्त्राचे म्हणजे खरे तर व्यवहारातील सामान्य ज्ञानाचे नियम वापरले गेले आहेत. वेगवेगळ्या आकारांच्या वस्तू एकमेकांवर आपटल्यावर नेमके काय होते याची कल्पना करून तुम्हाला योग्य त्या कृती करायच्या आहेत.
              हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
                  DOWNLOAD


📱 *Dictionary–Merriam-Webster*
          या अॅपमध्येदेखील अशाच प्रकारच्या सर्व सुविधा आहेत. हे अॅपदेखील ऑफलाइन वापरता येते. तसेच यामधे स्ट्राँग व्होकॅब्युलरी टेस्ट, ट्रु-फॉल्स, नेम दॅट थिंगसारखी पझल्सदेखील आहेत.
हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇
                        DOWNLOAD



📱 *Dictionary.com*
               या अॅपमधे वीस लाखांहून अधिक व्याख्या आणि समानार्थी शब्दांचा समावेश आहे. हे अॅपवापरण्यास अतिशय सोपे आहे. हवा असलेला शब्द सर्च बारमध्ये टाइप केल्यास त्या शब्दाशी संबंधित सर्व माहिती बघायला मिळते. *उदाहरणार्थ* ‘present’ हा शब्द शोधल्यावर त्याचा उच्चार ऐकता येतो. त्याखालोखाल डिक्शनरी आणि थेसॉरसमध्ये हा शब्द नाम, विशेषण, क्रियापद इ. यापैकी काय काय आहे हे सांगून त्या शब्दाचा अर्थ दाखवला जातो. त्याचे समान अर्थी आणि विरुद्धार्थी शब्द दिसतात.लर्नरखाली अर्थात नवशिक्यांसाठी त्या शब्दांचा अर्थ अधिक सोपा करून सांगितला जातो. तसेच त्या शब्दाचा वापर करून तयार केलेली उदाहरणेदेखील बघायला मिळतात. काहीशब्द पुन:पुन्हा शोधावे लागू नयेत म्हणून ते फेवरिटसमध्ये मार्क करून ठेवता येतात. एखाद्या शब्दाचा उच्चार माहीत असेल, परंतु स्पेलिंग माहीत नसल्यास सर्च बारमधील स्पीकरचे बटण दाबून त्या शब्दाचा स्पष्ट उच्चार करा. तो शब्द आपल्याला स्क्रीनवर दिसेल.  शोधलेले शब्द आणि त्यासंबंधित माहिती तुम्ही शेअर करू शकता. Word of the day च्या माध्यमातून दर दिवशी नवा शब्द या अॅपद्वारे शिकता येतो. तसेच येथे विविध विषयांवरील ब्लॉग्ज आणि स्लाइड शोजदेखील बघायला मिळतील. या अॅपचा एक मोठा फायदा म्हणजे हे अॅप तुम्हाला ऑफलाइन असतानादेखील वापरता येते. त्यासाठी अॅपमधील सेटिंग्जमध्ये ऑफलाइन डिक्शनरी सुरू करण्याची सोय आहे.हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇
                       
                          CLICK HERE



💢 *‘ऑटोडेस्क’ चे ‘इन्स्ट्रक्टेबल्स’ (Instructables)*
              हे अॅप, एक असे ठिकाण आहे जिथे या दोन्ही गोष्टी म्हणजेच नवीन गोष्टी शिकण्याची आणि तुम्ही केलेली नावीन्यपूर्ण गोष्ट जगासमोर ठेवण्याची संधी तुम्हाला मिळते, तेसुद्धा संपूर्णपणे विनामूल्य.      
        *उदाहरणार्थ* तुम्हाला मोत्यांचे दागिने, जसे की माळा किंवा ब्रेसलेट बनवून बघायचे आहेत. त्यासाठी सर्चबारमध्ये योग्य ते शब्द टाका. त्याच्याशी संबंधित असलेले सर्चरिझल्ट येथे दिसतील. त्यातील आवडलेले डिझाईन निवडल्यास त्या प्रकारची कलाकृती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, प्रत्येक टप्प्याची कृती फोटोसहित वाचायला मिळेल. काही ठिकाणी संपूर्ण कृतीचे व्हिडीओदेखील उपलब्ध आहेत.
              येथे केवळ हस्तकलाच नाही तर *तंत्रज्ञानासंबंधी कृती* उपलब्ध आहेत.  उदाहरणार्थ कॉम्प्युटरशी संबंधित करड इमेजच्या साहाय्याने विंडोज किंवा लिनस्कची बुटेबल वर इ ड्राइव्ह तयार करणे. लॅपटॉपच्या जुन्या बॅटरीजचा उपयोग करून पॉवरबँक तयार करणे. रासबेरी-पाय मायक्रो संगणक वापरून केलेली प्रोजेक्ट्स. रुबिक्स क्यूब सोडवणारा, ड्रॉइंग काढणारा, चेस खेळणारा रोबो बनवणे आणि यांसारखे इतर अनेक.
         तसेच *नावीन्यपूर्ण प्रकारच्या पाककृती* करून केलेले वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थ, उदाहरणार्थ केक्स, पास्ता, सॅलड्स, कॉफीचे वेगवेगळे प्रकार.तुम्ही स्वत: बनवलेली कलाकृती/पाककृती/एखादे कॉम्प्युटर अॅप/विज्ञानातील एखादा प्रयोग इत्यादी लोकांबरोबर शेअर करायचे असल्यास येथे अपलोड करण्याची सोय आहे. त्यासाठी तुम्हाला मुख्य पेजच्या वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या कॅमेऱ्याच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर प्रोजेक्टला नाव देऊन त्याचा प्रकार, उपप्रकार इत्यादी निवडायचा असतो. त्यानंतर प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेले फोटो, व्हिडीओज आणि इतर फॉरमॅटमधील फाइल्स जसे की, फाइल्स वगैरे अपलोड करता येतात. आवश्यक असलेल्या सर्व स्टेप्स येथे टाइप करून तुमचे प्रोजेक्ट या साइटवर प्रसिद्धकरता येते.येथे अनेक प्रकारच्या स्पर्धा सतत चालू असतात. सध्या बेकिंग, सॉफ्ट टॉइज, वूडन टॉइज अशा अनेक स्पर्धा चालू आहेत. प्रत्येक स्पर्धेचे नियम समजून घेऊन तुम्ही त्यात सहभागी होऊ  शकता.*सतत काही तरी नवीन करू इच्छिणाऱ्यांना, आपले ज्ञान आणि कला इतरांसमोर मांडून त्याचा जास्तीत जास्त लोकांना वापर करता यावा अशी इच्छा असलेल्या सर्वासाठी हे अतिशय प्रभावी माध्यम आहे.*
         हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
                         
                        CLICK HERE


🚊 *‘पीएनआर स्टेटस प्रीडिक्शन ट्रेनमॅन’ (PNR Status Prediction Trainman)* 🚊
                विशेष म्हणजे हे अॅप इंग्रजीशिवाय हिंदी, मराठी, कन्नड, तामिळ, तेलुगू, बंगाली आणि गुजराती या भाषांमध्येही वापरता येते.बहुतेक प्रवाशांना पडणारा नेहमीचा प्रश्न म्हणजे आपल्याला जायचे असणाऱ्या ठिकाणासाठी प्रवासाच्या दिवशी कोणकोणत्या गाडय़ा आहेत आणि त्यात आरक्षण उपलब्ध आहे का ? अॅपमध्ये प्रवास सुरू करण्याचे आणि संपण्याचे ठिकाण आणि प्रवासाची तारीख टाकली असता स्क्रीनवर त्या दिवशीच्या उपलब्ध गाडय़ा दाखवल्या जातात. त्या गाडीत कुठल्या वर्गाचे डबे आहेत आणि त्या वर्गाच्या प्रवासाचे भाडे किती असेल ते सांगितले जाते.जर आपण यातील एखादी गाडी निवडली तर आरक्षणाची स्थिती दाखवली जाते. जर आरक्षण उपलब्ध नसेल (म्हणजेच प्रतीक्षा यादी सुरू झालेली असेल) तर आरक्षण कन्फर्म होण्याची शक्यता किती टक्के आहे हे सुद्धा येथे दिसते. मागील काही दिवसांत प्रतीक्षा यादीतील किती लोकांचे आरक्षण कन्फर्म झाले होते यावरून हा अंदाज आपल्याला दिला जातो. त्यामुळे त्याच दिवशी प्रवास करायचा असेल तर प्रतीक्षा यादीतथांबायचे का दुसरा कोणता पर्याय निवडायचा याचा निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होते.हे या अॅपचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.
               याचबरोबर या गाडीचा मार्ग, मार्गावरील स्थानके, तेथे गाडी किती वेळ थांबणार याची वेळापत्रकानुसार माहिती या अॅपमध्ये तुम्हाला सहजपणे पाहता येते. प्रवासाच्या प्रत्यक्ष दिवशी अपेक्षित वेळ आणि प्रत्यक्ष वेळ यांमधील फरकही तुम्हाला दर्शवला जातो (म्हणजेच तुम्हाला गाडी उशीराने धावत असल्यास ती तुमच्या स्थानकावर किती उशिरा येईल याचा अंदाज मिळू शकतो.).या अॅपमधे एखाद्या रेल्वे स्थानकाचे नाव दिल्यास पुढील चार तासांत तेथे कोणत्या गाडय़ा येणार व सुटणार आहेत याची माहिती दिली जाते (यात उपनगरी गाडय़ांचाही समावेश आहे.).
              लांबच्या प्रवासाला जाताना गाडीत आपला डबा इंजिनपासून कितवा असेल याची माहिती असणे उपयोगाचे असते. सदर माहिती या अॅपमध्ये दिलेली आहे. एवढेच नव्हे तर स्लीपर डब्यांमधील बर्थ किंवा बसण्याच्या डब्यातील सीट्स कशा प्रकारे असतील याची आकृतीसहित माहिती दिलेली आहे. आपण काढलेल्या तिकिटाविषयी माहिती स्टेट्समध्ये कळतेच. काही कारणाने तिकीट कॅन्सल करायचे असल्यास सद्य:स्थितीत त्याची किती रक्कम नियमानुसार कापली जाईल ते स्क्रीनवर दिसते.अशी व यासारखी रेल्वेसंबंधी उपयुक्त माहिती देणारी बरीच अॅप्स (उदाहरणार्थ रेलयात्री, कन्फर्म तिकीट, इक्सिगो इत्यादी) गुगल अॅप स्टोअरवर आहेत. वाचकांनी आपल्या आवडीनुसार व गरजेनुसार अॅपची निवड करावी.
              हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
                           DOWNLOAD




📟 *Fraction calculator plus*  📟
         
                सर्वसाधारण कॅलक्युलेटरवर दशांश चिन्ह असलेल्या संख्यांची आकडेमोड करण्याची सोय असते. उदाहरणार्थ 2.5+3.6 ही आकडेमोड या कॅलक्युलेटरवर सहजपणे करता येते. परंतु पूर्णाकयुक्त अपूर्णाकाची बेरीज त्यावर सहज करून बघता येत नाही. उदाहरणार्थ 1.5 ही संख्या एक पूर्णाक एकछेद दोन (1½) अशी लिहिली जाते. आता समजा आपल्याला एक पूर्णाक एक छेद दोन (1½) आणि तीन छेद पाच  यांची बेरीज करायची असेल तर...? सर्वसाधारण कॅलक्युलेटरवर पूर्णाकयुक्त अपूर्णाक संख्या लिहिण्याची सोय उपलब्ध नसते.
                     या अॅपच्या साहाय्याने अशी आकडेमोड सहज करता येणार आहे.कॅलक्युलेटरचा स्क्रीन पाच भागांत विभागला आहे. एक भाग पूर्णाकाचे आकडे लिहिण्यासाठी, दुसरा भाग अंश आणि तिसरा छेदाचे आकडे लिहिण्यासाठी आहे. चौथ्या भागात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर ह्या गणिती क्रियांचा समावेश आहे आणि पाचव्या भागात आपण टाइप केलेली संख्या, गणिती क्रिया आणि त्यांचे उत्तर दर्शवणारा स्क्रीन आहे.तुम्हाला जर कधी पूर्णाकयुक्त अपूर्णाकांची आकडेमोड करायची गरज पडली तर हे अॅप नक्कीच उपयोगी होईल.
                 हे अँप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

                       DOWNLOAD


🐼 *अमेझिंग अॅनिमल फॅक्ट्स* 🐍
                   तुम्हाला माहीत आहे का, *गरुडाच्या अंगावर अंदाजे ७००० पिसे असतात* किंवा *कांगारूच्या शेपटीचा जमिनीला स्पर्श झाल्याशिवाय त्याला उडी मारता येत नाही* किंवा *मधमाशा त्यांच्या वजनाच्या ३०० पट जास्त वजन उचलू शकतात*. अशा प्रकारची प्राण्यांविषयीची भन्नाट माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ‘मुव्हिनअॅप’चे ‘अमेझिंग अॅनिमल फॅक्ट्स’ या अॅपमधे प्राण्यांविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. याअॅपमधे तुम्ही सर्च बारमध्ये तुम्हाला ज्या प्राण्याबद्दलची माहिती जाणून घ्यायचीआहे त्या प्राण्याचे नाव टाकून सर्च करू शकता.स्क्रीनवर वरच्या बाजूला असलेल्या एका प्राण्याच्या पंज्याच्या आयकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती रॅण्डमली वाचता येते. टेक्स्ट रूपातील ही माहिती ऑडियो स्वरूपात ऐकण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे.
                    हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
                           DOWNLOAD



🎯 *Cross the river* 🎯
            iMostMobile Tech,.JSC च्या Cross the river या अॅपमधे अशाप्रकारची अनेक अॅनिमेटेड कोडी आहेत.येथे प्रत्येक कोडे यशस्वीरीत्या सोडवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या स्टेप्स खेळून बघू शकता. कोडे सोडवण्यासाठी वेळाचे बंधन नाही. परंतु जर तुम्ही ५ मिनिटांच्या आत कोडे सोडवल्यासतुम्हाला रिवॉर्ड म्हणून एक नाणे मिळते. एखादे पझल सोडवण्यासाठी मदत हवी असल्यास तुम्हाला १० नाण्यांच्या बदल्यात ती मिळू शकते.
हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
                             DOWNLOAD


💢  *द किंग ऑफ ऑक्स (The King of OX)*              
                     हे तुमच्या बेरीज वजाबाकीच्या संकल्पना किती पक्क्याआहेत हे तपासणारे अॅप आहे. स्क्रीनवर तुम्हाला काही समीकरणे दाखवली जातात. त्यांपैकी काही बरोबर काही चूक असतील. *उदाहरणार्थ* ३ + ५ = ८  हे बरोबर समीकरण आहे तर ६ + २ = १० हे चुकीचे समीकरण आहे.एका मिनिटाच्या अवधीत जितक्या जलद जितकी जास्तीतजास्त समीकरणे चूक की बरोबर हे ठरवता तेवढा तुमचा स्कोर जास्त.
                 स्पर्धा परीक्षांच्या जगात मुलांसमोर वेगाने अचूक उत्तरे सोडवण्याचे आव्हान असते.मग बच्चे कंपनीकडून याचा सराव करून घेण्यासाठी ही अॅप्स एक प्राथमिक टप्पा ठरू शकतात.आणि हो, ही अॅप्स मोठय़ांनीही खेळून बघायला काही हरकत नाही. तुम्हालादेखील तेवढीच मजा येईल यात शंका नाही.
                 *हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक...*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
                      DOWNLOAD


💢 *पेपरेमा (Paperama)*
                      या अॅपमध्ये तुम्हाला अंदाजे शंभरएक कलाकृती बनवण्यासाठी पझल्स दिलेली आहेत. प्रत्येक पझलमधे तुम्हाला एक चौरसाकृती कागद दिलेला असतो आणि तुम्हाला जो आकार तयार करायचा आहे तो तुटक रेषेच्या साहाय्याने दर्शवलेला असतो. तसेच त्या स्क्रीनवर हे तुम्हाला किती घडय़ांमधे (फोल्ड्स) बनवायचे आहे हेदेखील सांगितलेले असते. टच स्क्रीनवर बोट योग्य तऱ्हेने फिरवून तुम्हाला कागदाच्या घडय़ा घालायच्या असतात. तुम्ही किती बिनचूक घडी घालता यावर तुमचा स्कोअर अवलंबून असतो. तुम्ही घातलेली एखादी घडी चुकीची आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती अनडू करू शकता. तसेच तुम्हाला हिंटची मदतदेखील येथे घेता येते.
                   ही पझल्स चार भागांत विभागली असून प्रत्येक भागात २४ लेव्हल्स आहेत. प्रत्येक लेव्हल सोडवून पूर्ण केल्याशिवाय त्या पुढील लेव्हल अनलॉक होत नाही. अशा प्रकारे बुद्धीला आणि कल्पनाशक्तीला चालना देणारा हा खेळ आहे.दररोजच्या धकाधकीच्या जीवनात लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारच्या ताण-तणावांना सामोरे जावे लागत असते. त्यातून काही काळ तरी बाहेर पडण्यासाठी ओरिगामी हा एक उत्तम उपाय आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. मनोरंजनासाठी या अॅपचा उपयोग नक्की करून बघा.
                        हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
                        DOWNLOAD



🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
*व्हेअर इज दॅट एजी जिओग्राफ्री क्विझ*
🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
               
                   भूगोल, नकाशे यांची विशेष आवड असणाऱ्यांसाठी ‘जेस्क्वेअरड’ च्या ‘व्हेअर इज दॅट एजीजिओग्राफ्री क्विझ’ ( Where is that AG Geography Quiz)  हे अॅप खूप चॅलेंजिंग आहे. यामध्ये देश, राजधान्या, शहरे, स्टेडियम, पर्वतशिखरे इत्यादींची अचूक जागा तुम्हाला शोधायची आहे. उदाहरणार्थ, युरोपातील ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना हे शहर तुम्हाला शोधायचे आहे. तर तुम्ही अंदाजे १०० किलोमीटरच्या अंतरात ते ठिकाणदाखवले तरच तुम्हाला गुण मिळतात. यामध्ये ‘लर्निग मोड’देखील आहे. प्रत्येक गेममध्ये तुम्ही नकाशावर ठिकाण दाखवले की त्या ठिकाणाच्या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी विकिपीडियाचा आयकॉनदेखील दिलेला आहे.या अॅप्समुळे भोगोलिक माहिती व नकाशे समजण्यास मदत होईल आणि त्यामुळे घरबसल्या तुम्हाला जगाच्या आणखी जवळ जाता येईल.
              हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
                    DOWNLOAD



🏁 *कंट्रीज ऑफ द वर्ल्ड * 🏁
                        ‘सॉक्रेटिका, एलएलसी’च्या कंट्रीज ऑफ द वर्ल्ड (Countries of the world)बया अॅपच्या माध्यमातून जगभरातील जवळजवळ सर्व देशांची ठळक माहिती मिळू शकते. ज्यामधे देशाची राजधानी, देशाचे क्षेत्रफळ, भाषा, लोकसंख्या, चलन, तो कोणत्या खंडातील आहेअशा बऱ्याच गोष्टींचा समावेश केलेला आहे. येथेही कोडी उपलब्ध आहेत. तुम्हाला हवे ते कोडे तुम्ही निवडू शकता. खंड, चलन, देशाचे नाव अशा अनेक विषयाशी संबंधित कोडी तुम्हाला निवडता येईल.भारताची राजधानी नवी दिल्ली, तसेच भारतातील राज्यांच्या राजधानीची शहरे जसे की, जयपूर, भोपाळ इत्यादींची जागा नकाशावर अंदाजे दाखवता येते. पण ती अगदी अचूक दाखवण्यासाठी नकाशाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे.
              हे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा...
                    DOWNLOAD

5 comments: